Ajit Pawar visits Kolhapur : शाहूपूरी सहावी गल्लीची अजित पवारांकडून पाहणी | Sakal Media |
कोल्हापूर(Kolhapur): उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) शिरोळ चा दौरा करून नुकतेच कोल्हापुरात पोहोचले आहेत. कोल्हापुरातील शाहूपुरी सहावी गल्लीत ते पाहणी करत आहेत. पूरग्रस्तांची पाहणी झाल्यानंतर आराखडा तयार करून पूरग्रस्तांसाठी कोणती मदत देता येईल याचा विचार करण्यात येईल अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे. त्यांच्याबरोबर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ(Hassan Mushrif), पालकमंत्री सतेज पाटील(Satej Patil), जलसंपदा मंत्री जयंत पाटील(Jayant Patil), राज्य आरोग्य मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर(Rajendra Patil) यांनी भेट देऊन माहिती घेतली. (व्हिडिओ- बी.डि.चेचर)
#Kolhapur #AjitPawar #KolhapurFlood #FloodInKolhapur #FloodInMaharashtra #KolhapurFloodSituation #KolhapurCity